BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : टाटा मोटर्सच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी झोपड्पट्टीमधील नागरिकांना केले स्वच्छतेबाबत जागृत

एमपीसी न्यूज- “थोडी तरी ठेवा जाण – सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण ” अशा ब्रीदवाक्यांचा वापर करुन समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उक्तीनुसार “स्वच्छता हीच सेवा होय” या प्रेरणेतुन टाटा व्हॉलेटिअरिंग अंतर्गत टाटा मोटर्स लि. स्नेह फौंडेशन, पुणे व पिपरी चिंचवड महानगरपालिका (स्वच्छता विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

भोसरी येथील महात्मा फुले झोपडपट्टी आणि वाकड येथील काळाखडक झोपडपट्टी येथे राबवण्यात आलेल्या मोहिमेत रस्ते स्वच्छता, प्लॅस्टिक गोळा करणे, त्या सोबतच या विषयीची जनजागृती होण्यासाठी चुटकुले, काव्य व घोषवाक्य यांचा वापर करण्यात आला. येथील नागरिकांना त्याचे महत्व पटवून देण्यात आले.

या मोहिमेमध्ये टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी अजोय बिहारी लाल, अलोक सिंग, प्लांट हेड (पुणे वर्क्स), सुनील सवाई, हेड (गिअर अँन्ड अँक्सल), प्रवीण ग्रोव्हर, हेड (पीई), हेमंत अनावकर, जनरल मॅनेजर (पीई), शशिकांत कात्रे, प्रतिनिधी, टाटा मोटर्स एम्प्लाईज युनियन, पुणे ब टाटा मोटर्स लि. पीई विभाग, गिअर आणि एक्सेल कारखान्यातील कर्मचारी, कामगार व त्यांचे कुटंबिय असे एकंदरीत 418 जणांनी सहभाग घेतला.

HB_POST_END_FTR-A2

.