Bhosari : टेम्पोच्या धडकेत रस्त्याने दुचाकी ढकलत घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी रस्त्याने ढकलत घेऊन जात असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 27 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती भोसरी येथे झाला आहे.

रोहित राजू पाटील असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रेखा राजू पाटील (वय 27, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित त्याची दुचाकी (एमएच 14 / जीजी 3771) ढकलत घेऊन जात होता. भोसरी मधील खंडेवस्तीकडून विश्वेश्वर चौकाकडे जाणा-या रस्त्यावर एमटेक कंपनीसमोर भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने (एमएच 12 / ईक्यू 9536) रोहित आणि त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.