Bhosari : भोसरी उड्डाणपुलाखालील वाहतुकीत तात्पुरता बदल

Bhosari: Temporary changes in traffic under the Bhosari flyover. आळंदी रोडने आल्यानंतर उड्डाणपुलाखालून उजवीकडे चाकणच्या दिशेने वळण्यास मनाई

एमपीसी न्यूज – भोसरी उड्डाणपुलाखाली आळंदीकडून येणा-या वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या हरकती आणि सूचना वाहतूक विभागाकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी गाव येथे उड्डाणपुलाच्या खाली भोसरी चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे भोसरी चौकातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे.

आळंदी रोडवरून येणा-या वाहनांना अंकुशराव लांडगे सभागृह व चाकणकडे जाण्यासाठी चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी आहे. या वाहनांनी भोसरी चौकातून डावीकडे वळून पुढे 50 मीटरवर असलेल्या पीएमटी चौकातून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जावे, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नागरिकांना काही हरकती आणि सूचना असतील तर त्यांनी पिंपरी-चिंचवड वाहूतक विभागाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा बदल 14 जून ते 28 जून या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचना यांचा विचार करून अंतिम आदेश देण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.