Bhosari : चर्चा करण्यासाठी बोलावून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – चर्चा करण्यासाठी बोलावून दोघांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री पावणेअकराच्या सुमारास भोसरी येथे अशोका हॉटेलजवळ घडली.

_MPC_DIR_MPU_II

प्रज्वल तुकाराम गुळवे (वय 22, रा. भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वराज प्रकाश कराळे (वय 22), ओंकार बाळासाहेब भोगाडे (वय 22, दोघे रा. आळंदी रोड, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रज्वल याला आरोपींनी चर्चा करण्यासाठी भोसरी येथील अशोका हॉटेलजवळ सीएमईकडे जाणा-या रस्त्यावर बोलावले. काही वेळ चर्चा झाल्यानंतर आरोपी स्वराज याने प्रज्वलच्या चेह-यावर कोयत्याने मारले. यामध्ये प्रज्वलचे चेह-याचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यानंतर, प्रज्वल पळून जात असताना आरोपी ओंकार याने कोयता फेकून मारला. यामध्ये प्रज्वलच्या खांद्यावर दुखापत झाली. प्रज्वल त्याच्या मित्राच्या गाडीतून जात असताना आरोपींनी गादीवर कोयत्याने मारून गाडीचे देखील नुकसान केले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1