Bhosari : महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल चोरीला

एमपीसी न्यूज : महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल दोन्ही गोष्टी चोरीला गेल्या आहेत. ही चोरी गुरुवारी (दि.1) मध्य रात्री भोसरी येथे पुणे – नाशिक महामार्गाजवळ घडली आहे.

Pimpri : कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत तरुणाला लुटले

याप्रकऱणी फुलचंद मुंजाजी पाचांगे (वय 43 रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी कशाच्या तरी सहाय्याने महावितरणचे  ट्रान्सफॉर्मर तोडले व त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल अशा 79 हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.