Bhosari : अन्नधान्य वाटप करून जवळकर दांपत्याने केला लग्नाचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करून एका दांपत्याने आपल्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला आहे. भाजपा पिंपरी-चिंचवड शहर माजी सरचिटणीस, महापालिकेचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि श्री भैरवनाथ ग्रामविकास ट्रस्ट कासारवाडीचे सचिव प्रकाश जवळकर यांनी हे समाजाप्रती आपले योगदान दिले आहे.

दोन दिवस गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी रविशेठ जवळकर, विरुशेठ जवळकर, अॅड अमित जवळकर, बाळासाहेब जवळकर, गुलाबराव जवळकर, आप्पासाहेब धावडे, सुधीर जवळकर, शशिकांत जवळकर, गणेश जवळकर, नानासाहेब डवरी, आझमभाई पटेल, ख्वाजाभाई पटेल, संतोष टोणगे, बापुसाहेब भोसले, देवदत्त लांडे, रघुनाथ जवळकर, जितेंद्र लांडगे आदी उपस्थित होते.

सोमवारी प्रकाश जवळकर यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस होता. सध्या देशावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सुमारे दीड महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व उद्योग, धंदे बंद झाले आहेत. यात अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कुटुंबाचे हाल होत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या सुचनेनुसार जवळकर यांनी गरजूंना मदत करण्याचे ठरवले.

लॉकडाऊनच्या काळात कुठलाही सण, समारंभ थाटात करणे योग्य नाही. त्यामुळे या काळात शक्य तेवढी गरजूंना मदत करायला हवी. जवळकर यांनी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील गरीब, कंत्राटी सफाई कामगार, घरगुती धुणी, भांडी, सफाई कामगारांना (मोलकरीण) संपूर्ण अन्नधान्याचे किट वाटप केले.

सर्वांच्या चेह-यावरील हास्य पाहून समाधान वाटले. ख-या अर्थाने लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याचे समाधान मिळाले, असल्याचे जवळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.