Bhosari : प्रत्येक घरात हवीच अशी ‘दक्षता फ्रीज बॅग’

एमपीसी न्यूज – बदलत्या जीवनशैलीसाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी आपण सहजगत्या आपल्या घरात स्वीकारत गेलो. नव्या जमान्यातील अनेक उपकरणे आपले दररोजचे जीवन सुसह्य करत असतात. आपल्या राहणीमानात आपण काळानुरुप बदल घडवले. त्यामुळे फ्रीज, टीव्ही, मिक्सर, रेडिओ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे या उपकरणांसाठी आवश्यक अशा काही पूरक गोष्टी बनवण्याचे नवीन व्यवसाय सुरु झाले. दक्षता फ्रीज बॅग हा असाच एक वेगळा व्यवसाय भोसरी येथील प्रतिभा घुंगुर्डे यांनी सुरु केला आहे. बदलती जीवनशैली आणि दैनंदिन गरजा यांचा विचार करुन सुरु झालेला एक वेगळा व्यवसाय म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो.

फ्रीजमधले अन्न म्हणजे भाजीपाला, चटण्या, वेगवेगळी पीठे आहे तशी अनेक दिवस टिकण्यासाठी या बॅग्जचा उपयोग होतो. या फ्रीज बॅगच्या सेटमध्ये एकूण पाच वेगवेगळ्या आकाराच्या बॅग असतात. बॅगला आतून कापड लावलेले असल्याने ते भाज्यांमधील पाणी शोषून घेते. त्यामुळे भाज्या, फळे, फुले जास्त दिवस टिकतात. शिवाय भाज्यांचा वास इतर पदार्थांना लागत नाही. तसेच कडधान्ये, डाळी, रवा, पीठे ठेवण्यासाठी या बॅगा अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच चांदीची भांडी, मोत्यांचे दागिने ठेवण्यासाठी सुद्धा या बॅगा अत्यंत उपयुक्त आहेत. या बॅग धुता देखील येतात. आतील कापड सहजगत्या काढून धुता येते त्यामुळे ते स्वच्छ राहते. कडधान्याला लवकर मोड आणण्यासाठी कडधान्ये भिजवून, निथळून या बॅगमध्ये ठेवता येतात.

मालाचा उत्तम दर्जा आणि सोसायटीतील ग्राहकांची मागणी यामुळे दिवसेंदिवस आमचा व्यवसा वाढतच आहे, म्हणूनच आम्ही फ्री होम डिलिव्हरी देखील सुरु केली आहे, अशी माहिती दक्षता बॕगच्या संचालिका प्रतिभा घुंगुर्डे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा –
प्रतिभा घुंगुर्डे – 9822886509, 8999430734

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like