Bhosari : माजी शिक्षकाची मुख्याध्यापिकेला दमदाटी

एमपीसी न्यूज – माजी शिक्षकाने शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेसह इतर शिक्षकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी पाचच्या सुमारास हिंदी माध्यमिक विद्यालय आदिनाथ नगर भोसरी येथे घडली.

शर्मिला शरद कांदेकर (वय 48, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय जिलाजीत तिवारी (वय 42, रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला कांदेकर भोसरी येथील हिंदी माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास नववीच्या वर्गामध्ये शिकवत होत्या. त्यावेळी संजय शाळेत आला. त्याने शर्मिला यांना आणि त्यांच्या शाळेतील शिक्षकांना शिवीगाळ करून दमदाटी केली. याबाबत शर्मिला यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.