Bhosari : जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित शिबिरात 110 नागरिकांची मोफत तपासणी

एमपीसी न्यूज – जागतिक मधुमेह दिनानिमित्त भोसरी येथील वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर यांच्या वतीने मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात भोसरी परिसरातील सुमारे 110 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.

शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष मुकुंद आवटे यांनी केले. यावेळी ला. डॉ. रोहिदास आल्हाट, ला. मुरलीधर साठे, ला. अरुण इंगळे, ला. दिगंबर ढोकले, अ‍ॅड. सतिश गोरडे, अ‍ॅड. अक्षदा आग्रे, महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभागातील उपअभियंता नारायण आल्हाट, डॉ. संदीप कवडे, डॉ. अर्चना कवडे, डॉ. शंकर गोरे, लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. डॉ. कल्पना कोतवाल आणि डॉ. प्रियांका चौरे यांनी सहभाग घेतला.

डॉ. माधुरी आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये 1 हजार 500 रुपयांपर्यंत मोफत तपासण्या करण्यात आल्या. रक्तातील साखरेचे प्रमाण, मागील तीन महिन्यातील साखरेचा गुणांक, रक्तदाब यांसारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच नागरिकांना तज्ञ डॉक्टरांनी आहारविषयक सल्ला व मार्गदर्शन केले.

वात्सल्य हॉस्पिटलच्या प्रशासन प्रमुख डॉ. स्वप्ना डांगमाळी, परेश कुंभार, रोशन प्रसाद, दीपक पवार, प्रसाद बुरडे, प्रमिला मानकर, प्रकाश उंडे, विष्णू खांडेकर, अनिल अवचार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी हॉस्पिटलचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like