Bhosari : शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी देणा-या संस्थाचालकाला अटक

एमपीसी न्यूज – शिक्षकाला गोळ्या घालण्याची धमकी देणा-या संस्थाचालकाला अटक करण्यात आली. शाळेत जाऊन शिक्षकाला शिवीगाळ करत चप्पलने मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. 13) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत बाबासाहेब बाबर (वय 64) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजीव रामचंद्र बाबर (वय 40, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीव बाबर हे इंद्रायणीनगर येथील स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर, आरोपी संस्थेचा संस्थाचालक आहे. शुक्रवारी शाळेत आल्यानंतर आरोपी यशवंत बाबर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांची गचांडी पकडून हाताने, चप्पलने मारहाण केली.

तसेच ‘बाहेर ये, तुला गोळ्याच घालतो’, अशी धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.