BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : चाकूचा धाक दाखवून पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री दहाच्या सुमारास फुलेनगर एमआयडीसी भोसरी येथे घडली.

वैभव रमेश महाजन (वय 26, रा. नेहरूनगर) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास वैभव कामावर जात होता. तो फुलेनगर येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मागच्या गेटसमोर आले असता मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांला चाकूचा धाक दाखवला.

चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.