Bhosari : टेम्पोचालकाला मारहाण करीत लुटले; चोरट्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – टेम्पो चालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या खिशातून चारशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना 30 एप्रिल रोजी एमआयडीसी भोसरी येथे घडली.
टेम्पोचालक प्रशांत सोन्याबापू सरजीने (वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत इंद्रायणी कॉर्नर ते लांडेवाडी येथे भाडे घेऊन जात असताना आरोपींना त्यांना अडविले. त्यांना टेम्पोतून खाली खेचून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील चारशे रुपये जबरदस्तीने काढून घेऊन आरोपींनी पोबारा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.