Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्राला चालना अन् महिला सक्षमीकरणाला मिळाली गती – नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदारसंघात क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली. विविध खेळांमध्ये महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी नावलौकिक मिळवला आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमदार महेश लांडगे यांची आग्रही भूमिका राहिली आहे. इंद्रायणी थडी हे महिलांसाठी अत्युच्च व्यासपीठ असल्याचे नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी सांगितले.

नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे म्हणाल्या, “महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन ही संस्था मागील 15 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी भव्य दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव आणि महाशिवरात्रीनिमित्त होणारा कीर्तन महोत्सव असे विविध सामाजिक उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येतात. तसेच, कराटे, ज्युडो, तायक्वाँदो, किकबॉक्सिंग, तलवारबाजी, रायफल शुटिंग, बॉक्सिंग, मॅरेथॉन, उशु आदी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच, फाउंडेशनच्या सहकार्याने महिला कबड्डी संघ कार्यरत आहे. सुमारे 70 कबड्डीपट्टू सराव करीत आहेत. कुस्ती संकूलही सुरू आहे. त्यामध्ये 30 ते 35 कुस्तीपट्टू तालमीत कुस्तीचा सराव करीत आहेत.

यासह व्हॉलीबॉलचाही संघ तयार करण्यात आला आहे. बॅडमिंटन हॉल विकसित केला असून, त्याद्वारे स्पर्धाही आयोजित केल्या जातात. फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये क्रीडा सप्ताह आयोजित केला जातो. भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील महिला कबड्डीपटूंसाठी स्वतंत्र संघ अस्तित्वात नव्हता. मात्र, फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच मुलींचा कबड्डी संघ तयार केला आहे. संघाच्या माध्यमातून 70 ते 80 मुली नियमित आराव करीत आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, खेलो इंडिया आदी महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये संघाच्या खेळाडुंनी प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच, पूजा शेलार कबड्डीपटूला शिवछत्रपती पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे.

व्हिजन अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आणि सैनिक भरती मार्गदर्शन, भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, शारीरिक तपासणी व अभ्यासक्रम याबद्दल तरुणांना माहिती दिली जाते. शासकीय सुरक्षा रक्षक प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून अ‍ॅकॅडमीने अनेक मुलांना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे 2 हजार 500 मुला-मुलींना नोकरीची संधी मिळाली आहे. सायबर क्राइम, इंटरनेटच्या खबरदारीबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच, अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून शाळा, कॉलेज व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत बचावात्मक प्रशिक्षण देण्यात येते. भारतीय वायू सेना आणि अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात प्रथमच भोसरीमध्ये वायू सेना भरती कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पमध्ये तब्बल 8 हजाराहून अधिक मुलांनी सहभाग घेतला. त्यापैकी 190 मुलांना वायु सेनेत भरती होण्याची संधी मिळाली आहे.

महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन केले. महाराष्ट्रभर नावलौकिक निर्माण झालेल्या जत्रेला चार दिवसांमध्ये तब्बल पाच लाख नागरिकांनी भेट दिली. भोसरी मतदारसंघातील 580 महिला बचतगट व वैयक्तिक महिलांनी या जत्रेत सहभाग घेतला. या जत्रेत सुमारे साडेचार कोटी रुपयांची उलाढाल झाली. इंद्रायणी थडीच्या माध्यमातून लहान मुलांसाठी बालजत्रा, महिलांसाठी भजन स्पर्धा, गावरान खाद्य महोत्सव, महिला आरोग्य शिबीर, फॅशन शो, डान्स स्पर्धा, महिला उद्योजकता मार्गदर्शन, होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांसाठी पारंपरिक खेळ, महिलांसाठी जॉब फेअर, योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्यात आले . ही जत्रा यापुढे दरवर्षी होणार असल्याचेही नगरसेविका गव्हाणे यांनी सांगितले.

व्हिडिओ –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.