Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच शासकीय कार्यालयात सुसूत्रता आणि पारदर्शी कारभार -पिराजी काशीद यांचे मत
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि भोसरी परिसरात असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये पूर्वी अनागोंदी कारभार होता. एखाद्या कामासाठी कार्यालयात गेल्यास काही तास प्रतीक्षा करावी लगत असे. काम पूर्ण होण्यासाठी तर काही आठवडे आणि महिने सुद्धा लगत होते. मात्र, मागील पाच वर्षात आमदार महेश लांडगे यांनी शासकीय कार्यालयात सुसूत्रता आणली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांची कामे तत्काळ होत आहेत, असे मत स्थानिक नागरिक पिराजी काशीद यांनी व्यक्त केले.
पिराजी काशीद म्हणाले, “महापालिकेशी संबंधित असेलल्या तसेच अन्य शासकीय कार्यालयात कामासाठी गेल्यास पूर्वी संबंधित अधिका-यांची उदासीनता दिसत असे. तत्काळ कामे पूर्ण करण्यावर त्यांचा अजिबात भर नव्हता. त्यामुळे संबंधितांपर्यंत काम पोहोचविण्यासाठी सुद्धा काही तासांचा अवधी लगत असे. त्यानंतर ते काम पूर्ण होण्यासाठी काही आठवडे आणि काही महिन्यांचा सुद्धा कालावधी लगत असे. आमदार महेश लांडगे यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्माचा-यांच्या बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या.”
पिराजी काशीद पुढे म्हणाले, “शासकीय कार्यालयातून नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा मनस्ताप सहन करावा लगत असे. 2014 नंतर आमदार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिका-यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या. त्यामध्ये अधिका-यांना सूचना देण्यात आल्या. तसेच आमदार महेश लांडगे यांनी सुरु केलेल्या परिवर्तन हेल्पलाईनचा देखील मोठा फायदा झाला आहे. नागरिक परिवर्तन हेल्पलाईनवर संपर्क करून त्यांचं अडचणी सांगू शकतात. परिवर्तन कडून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाते. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.”
व्हिडीओ –