Bhosari : गव्हाणे वस्तीमधून भर दिवसा दुचाकी चोरली

The two-wheeler was stolen from the Gawhane wasti settlement during the day

एमपीसी न्यूज –  घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केलेली मोपेड दुचाकी  चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेली. ही घटना 30 मे रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत गव्हाणे वस्ती, भोसरी  येथे  घडली.

याप्रकरणी  परवेझ नजीर मुल्ला (वय 30, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परवेझ यांनी त्यांची मोपेड दुचाकी (एमएच 14 / एफवाय 7709) 30 मे रोजी घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत लॉक करून पार्क केली होती. दुपारी दोन ते पाच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी परवेझ यांची दुचाकी चोरून नेली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.