Bhosari : ऑफिसमधून लॅपटॉप आणि मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी ऑफिसमधील लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 2) दुपारी अडीचच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडली.

नितीन दत्तात्रय फुंडे (वय 35, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फुंडे यांच्या ऑफिसमध्ये कोणीही नसताना चोरट्यांनी दरवाजाची कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी ऑफिसमध्ये ठेवलेला लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 45 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.