Bhosari : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली.

संदीप प्रल्हाद घोरपडे (वय 53, रा. सद्गुरूनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एम एच 14 / एच वाय 8599 ही दुचाकी शनिवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.