Bhosari: घरासमोर उभा केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली

Bhosari: Thieves stolen a two-wheeler parked in front of a house अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांची दुचाकी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली.

एमपीसी न्यूज- राहत्या घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे शनिवारी (दि.13) सकाळी उघडकीस आली.

गणेश शंकर निघोट (वय 22, रा. खंडेवस्ती, एमआयडीसी, भोसरी) यांनी सोमवारी (दि.15) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.12) रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी निघोट यांनी आपली 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14 एचवाय 3356) राहत्या घरासमोर पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांची दुचाकी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.