Bhosari : कोयत्याचा धाक दाखवून तिघांना लुटले; सहाजण अटकेत

एमपीसी न्यूज – कोयत्याचा धाक दाखवून सहा जणांनी मिळून तिघांना लुटले. ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी साडेचारच्या सुमारास बुद्धविहार रोड दापोडी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

प्रकाश मारुती कटकधोड (20), साहिल अल्लाबक्ष मुकरताल (वय 19), कासीम मोला मोरशद (वय 22), अमोल बसवराज वाल (वय 20, सर्व रा. निगडी), गणेश बाळासाहेब मतकर (वय 19), नितेश खंडू साहिज (वय 20, दोघे रा. तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चेतन गणेश सपकाळ (वय 22, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास चेतन त्यांचे मित्र राकेश जगताप, निखिल खरात यांच्यासोबत गप्पा मारत बुद्धविहार रोड दापोडी येथील गोल्डन चहाच्या टपरीसमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी कोयत्यासारखे शस्त्र चेतन यांच्या गळ्याला लावले.

तसेच त्यांच्या मित्रांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत, चेतन यांच्या खिशातून 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि आठ हजार रोख रक्कम, राकेशच्या खिशातून 2 हजार 800 रुपये रक्कम आणि निखिलच्या खिशातून 2 हजार 500 रुपये असा एकूण 25 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

  • याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.