Bhosari : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांकडून एक लोखंडी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, दोन लोखंडी कोयते असा 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला.

राजेश ऊर्फ मुन्ना रविशंकर तिवारी (वय 23), रमजान मशाल कुरणे (वय 26, दोघे रा. चिखली) आणि अविनाश महादेव जाधव (वय 22, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई आशिष मल्लेश गोपी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांना गुरुवारी (दि. 5) दुपारी साडेपाचच्या सुमारास गुडविल चौक येथील सीएनजी पंपाजवळ तिघे संशय थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली.

पोलिसांनी तिघांकडून एक लोखंडी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन लोखंडी कोयते असा 20 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.