Bhosari : वेश्या व्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा; दोन महिलांची सुटका

Chinchwad : बेकायदेशीरपणे दारू वाहतूक केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देविदास याने त्याच्या राहत्या घरात वेश्या व्यवसाय चालवला. त्याने दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता आरोपीच्या घरावर छापा मारून कारवाई केली.
यामध्ये पोलिसांनी दोन पिडीत महिलांची सुटका केली. तर देविदास हनवते याला अटक केली. पिडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्यानंतर मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली असल्याचे तपासात समोर आले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत ( Bhosari ) आहेत.