Bhosari : महिलेच्या विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री पावणेनऊच्या सुमारास फुगेवाडी मेगामार्टच्या समोर घडली.

नरेश प्रकाश धोत्रे (वय 36, रा. फुगेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सारिका नरेश धोत्रे, सीताबाई प्रकाश धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी यांच्या भाच्याचे आरोपी नरेश याच्या सोबत भांडण सुरु होते. ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी तिथे गेल्या असता आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर, फिर्यादी यांनी जोराने ढकलून देऊन खाली पाडले. यामध्ये त्यांच्या हात, पाय, डोक्याला इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.