Bhosari : दापोडी दुर्घटनेतील आरोपींना तीन दिवसाची कोठडी

एमपीसी न्यूज – दापोडी येथे रविवारी सायंकाळी मातीचा ढिगारा ढासळून झालेल्या दुर्घटनेत अग्निशामक दलाच्या जवानासह दोन जणांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले. याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना मंगळवारी (दि. 3) खडकी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुनील रमेश शिंदे (वय 30, रा. डांगेचौक, थेरगाव), धनंजय सुधाकर सगट (वय 29, रा. गणेशनगर, थेरगाव), अशोक माणिकराव पिल्ले (वय 57, रा. चंदननगर, खराडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह मे. पाटील कन्ट्रक्‍शनचे मालक एम. बी. पाटील आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कल्याणी पिरप्पा जमादार (वय 56, रा. फुगेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे महापालिकेच्या ड्रेनजलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून नागेश जमादार यांचा मृत्यू झाला. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांचाही अंगावर मातीचा ढिगारा पडून मृत्यू झाला. तर या घटनेत चारजण जखमी झाले.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक केली. आरोपी शिंदे, सगट आणि पिल्ले यांना मंगळवारी दुपारी खडकी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 6 डिसेंबर पर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.