Bhosari : भोसरी, देहूरोड, चिखली परिसरातून तीन लाखांचे सोने हिसकावले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भोसरी, देहूरोड आणि चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तू असा एकूण 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेश अशोक थोरात (वय 24, रा. पिंपळे सौदागर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक आणि त्यांचा मित्र हे दोघेजण मंगळवारी (दि. 29) रात्री जेवण आणण्यासाठी कासारवाडी येथे गेले होते. मात्र, हॉटेल बंद असल्याने ते माघारी निघाले.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी आदेश यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, मित्राचा आणि त्यांचा मोबाईल असा 66 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती काढून घेतला. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

तर, दुसऱ्या घटनेत, कोमल किरण चव्हाण (वय 23, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देहू-आळंदी रोडवरील महालक्ष्मीनगर येथे मंगळवारी (दि. 29) रात्री पावणे नऊच्या सुमारास कोमल रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने कोमल यांना थांबण्यास सांगितले. कोमल भर रस्त्यात थांबल्या असता चोरट्याने त्यांच्या गळ्यातून अडीच तोळे वजनाचे 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

विष्णू निवृत्ती म्हेत्रे (वय 53, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. 29) रात्री साडेआठच्या सुमारास स्पाईन रोड कुदळवाडी येथे साळुंके कॉम्प्लेक्स समोरून फिर्यादी म्हेत्रे त्यांच्या पत्नीसह मोपेड दुचाकीवरून जात होते. एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी म्हेत्रे यांच्या पत्नीच्या गळ्यातील 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.