Bhosari : भांडणाची तक्रार दिल्यावरून तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भांडणाची तक्रार पोलिसात दिल्यावरून एकाला मारहाण केली. त्यानंतरही पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तिघांना पुन्हा अडवून मारहाण केली. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेआठच्या सुमारास मोरया चौक, आदर्शनगर, मोशी येथे घडली.

बबन साहेबराव तुपसौंदर (वय 42, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर कुसाळकर (रा. फातिमा नगर, मोशी) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलतभाऊ सुरेश तुपसौंदर यांना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. याबाबत फिर्यादी त्यांचा लहानभाऊ उद्धव आणि चुलतभाऊ सुरेश असे तिघेजण पुन्हा तक्रार देण्यासाठी पोलिसात जात असताना आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात, हातावर व पायावर मारून फिर्यादी व त्यांच्या दोन्ही भावांना जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.