Bhosari : घरफोडी करून ‘तीन हजार सिंगापूर डॉलर’ची चोरी

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन हजार सिंगापूर डॉलर चोरून नेले. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे शनिवारी (दि. 14) पहाटे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

दारासिंग माणिकसिंग राजपूत (वय 43, रा. विशाल रेसिडन्सी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 14 डिसेंबर दरम्यान फिर्यादी दारासिंग यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून, लाकडी कपाट उचकटून आतील तीन हजार सिंगापूर डॉलर (भारतीय चलनानुसार दीड लाख रुपये) चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1