Bhosari : पूर्ववैमनस्यातून महिलेला पिस्तूल दाखवत गोळ्या घालण्याची धमकी

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला पिस्तूल दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री पावणेअकराच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथे घडली.

ज्ञानराज लांडगे (वय अंदाजे 27, रा. गवळी माथा, भोसरी), कृष्णा शिंदे (वय 30, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), लोकेश कुळे (वय 26, रा. शीतलबाग, भोसरी ) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्वेता गुरुदत्त पांडे (वय 20, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती आणि आरोपींचे पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपी सोमवारी रात्री फिर्यादी यांच्या घरी आले. आरोपी ज्ञानेश्वर हातात पिस्तूल घेऊन येत असल्याचे पाहिल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करून दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडला नाही, तर गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.