Bhosari: स्केटींग ट्रॅकची उर्वरीत कामे महापालिका पूर्ण करणार

एमपीसी न्यूज – भोसरी, इंद्रायणीनगर येथील सेक्टर क्रमांक एकमधील भूखंडावर स्केटींग ट्रॅकची उर्वरीत कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक कोटी 30 लाख रूपये खर्च होणार आहे.

प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगर येथे सेक्टर क्रमांक एकमधील भूखंडावर स्केटींग ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. या स्केटींग ट्रॅकचे उर्वरीत काम करण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1 कोटी 51 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 1 कोटी 48 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, सहा ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी डी. डी. कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 13.99 टक्के कमी दराने निविदा सादर केली. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्वीकृत योग्य दरापेक्षा कमी येत आहे.

  • सुमारे 1 कोटी 48 लाखापेक्षा 13.99 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 27 लाख अधिक रॉयल्टी चार्जेस 1 लाख 96 हजार रूपये आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 58 हजार रूपये असे एकूण 1 कोटी 30 लाख 46 हजार रूपये खर्च होणार आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या कामांची निविदा स्वीकारण्यास 21 जून रोजी मान्यता दिली आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार, या ठेकेदारासमवेत करारनामा करण्यात येणार असून त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.