Bhosari: भोसरीतील ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलिसांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. भोसरी परिसरातील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता भोसरीतील तीन मुख्य रस्ते, दिघीरोड आणि दापोडीतील एका रस्ता पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहेत. वाहतूक शाखाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी आज (शनिवार) याबाबतचे आदेश काढले आहेत.

भोसरी, गवळीनगर, दिघी, च-होली हा भाग येत असलेल्या ‘इ’ प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत.

‘हे’ चार रस्ते वाहतुकीसाठी बंद

# भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील स्मशानभुमीकडे जाणारा रोड
# ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाशेजारील गोकुळ हॉटेल ते गवळीमाथा, एमआयडीसी भोसरी रस्ता
# गव्हाणे पेट्रोलपंप ते दिघी रोड, सिद्धेश्वर शाळेसमोरील रोड
#दापोडीतील भाऊपाटील रोड शिवाजी पुतळ्याकडे येणारा रोड

हे चार रस्ते पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, यामध्ये  अग्निशामक, रुग्णवाहिका आणि पोलीस यासह  अत्याश्यक सेवेतील वाहनांना सवलत देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.