Bhosari : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे उतरले रस्त्यावर

एमपीसी न्यूज – आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. आज दुपारी भोसरी परिसरात पुणे- नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी स्वतः आमदार महेश लांडगे यांनी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या समवेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सरसावलेले पाहायला मिळाले.

आज दुपारी भोसरी परिसरात पुणे- नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक नागरिक आणि वाहने या कोंडीत अडकले होते. यावेळी बहिणींना आपल्या भावाला वेळेवर राखी बांधता यावी यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम करीत होते. त्यांच्या समवेत आमदार महेश लांडगे हे देखील जातीने उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत असल्याचे पाहायला मिळाले. सोशलमिडीया आणि भोसरी परिसरात महेश लांडगे यांनी केलेल्या या मदतकार्याचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.