BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : शिवतेजनगर येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व आई निर्मिती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 9) श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमात एकूण 30 ते 40 झाडे मंदिराच्या परिसरात लावण्यात आली. कार्यक्रमासाठी दोन्ही संस्थेचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमसाठी श्री स्वामी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक नारायण बहिरवाडे, आई निर्मिती संस्थेचे अध्यक्ष समीर मुल्ला, सचिन लाकम, प्रिया गायकवाड, प्रमोद पाटील, सुधीर अडसूळ, रवी, महेश, संजय पाटील, अवंतिका, तुषार फलके, शैलेश पगारे, राजू गुणवंत, संतोष शेळके, मंगेश पाटील,सूत्रसंचालक राजाराम सावंत, प्रिया गायकवाड, नागनाथ दोडके, कैलास मुळे, अशोक सूर्यवंशी, शिंदे काका, कमलिनी जगताप, आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.