Bhosari: साडेपाच लाखांचा ‘पास्ता’ घेऊन ट्रकचालक फरार

एमपीसी न्यूज – पास्त्याचा व्यवसाय करणार्‍या एका कंपनीमार्फत हरियाणा येथून पास्ता मागवून घेतला. मात्र, ट्रकमधील 50 बॉक्स पास्ता घेण्याऐवजी चालक साडेपाच लाखांचे 550 पास्त्याचे बॉक्स घेऊन फरार झाला. ही घटना मोशी टोलनाका येथे नुकतीच उघडकीस आली.

गोविंद मिना, भावेश, युवराज (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नागेश रायेश्वर हेगडे (वय-47, रा. वर्तकनगर, ठाणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाण्यातील इब्रो इंडिया या कंपनीत नोकरीला आहेत. फिर्यादी यांच्याशी पास्ता व्यवसायावरून आरोपी गोविंद मिना याच्याबरोबर फोनवर वारंवार बोलणे होत होते. त्यातून त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपी भावेश याने फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकेचा क्रॉस धनादेश दिला. फिर्यादीने त्यांच्या कंपनीमार्फत हरियाणा येथील कंपनीला पास्त्याची ऑर्डर दिली.

सात लाख 6 हजार रूपयांचा 11 टन पास्ता घेऊन ट्रक मोशी टोल नाका येथे आला. तेथे आरोपी गोविंद मिना याने त्याचा साथीदार युवराज याला (एमएच-04, जीसी 2360) घेऊन पाठविले. पास्त्याचे 50 बॉक्स घेण्याऐवजी आरोपीने 5 लाख 58 हजारांचे 550 पास्त्याचे बॉक्स ट्रकमध्ये भरले. तसेच गोविंद मिना यांना फोन करायचा असल्याचे खोटे सांगून ट्रकचालकाचा मोबाईल घेऊन पसार झाला. एमआयडीसी, भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.