Bhosari : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – अडीच वर्षाच्या चिमुकलीला चिकन खायला देण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

ननकु श्रीविलास सिंह (वय 20, रा. भोसरी. मूळ रा. फतेहपूर, राज्य – उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चलो, तुम्हे चिकन खाने को देता हू’ असे म्हणून आरोपी चिमुरडीला घरातून घेऊन गेला. इंद्रायणी नगरमधील अॅरिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या मागे नेऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार चिमुरडीच्या वडिलांना समजताच त्यांनी पोलीस धाव घेऊन गुन्हा नोंदवला. ननकु याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.