_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Bhosari : दोन मोटारसायकलसह एक ई-सायकल चोरीला; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – भोसरी आणि एमआयडीसी भोसरी परिसरातून दोन मोटारसायकल तर हिंजवडी परिसरातून एक ई-सायकल चोरीला गेल्याच्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तुकाराम सदाशिव राजेशिर्के (वय 62, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तुकाराम यांनी त्यांची एम एच 14 / एफ व्ही 5357 ही 25 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

संतोष छगनराव घुमरे (वय 43, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोष यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ आर 1337 ही दुचाकी घरासमोर 14 नोव्हेंबर रोजी रात्री पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

नितीश दत्तात्रय पुरंदरे (वय 25, रा. धनकवडी पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची हिरव्या काळ्या रंगाची 15 हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल मुकाईनगर मजा 9 चौक हिंजवडी येथ पार्क केली. अज्ञात चोरट्याने सायकल चोरून नेली. ही घटना 29 सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.