Bhosari : भोसरी, चाकणमधून दोन दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज – भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 35 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत बुधवारी (दि. 4) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विमलकुमार रामनिवास चौरसिया (वय 39, रा. खंडोबामाळ, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 27 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास विमलकुमार यांनी आपली 15 हजार रुपयांची एमएच 14 / जीबी 6033 ही दुचाकी आळंदी रोडवरील चिट्टे हॉस्पिटल समोर सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. 28 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ती दुचाकी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. भासोरी पोलीस तपास करीत आहेत.

रवींद्र केरभाऊ कान्हुरकर (वय 33, रा. कान्हुरकर मळा दावडी, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (दि. 3) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास रवींद्र यांनी त्यांची 20 हजार रुपयांची एम एच 14 / डी क्यू 7182 ही दुचाकी म्हाळुंगे गावातील महालक्ष्मी मंदिराजवळ पार्क केली. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like