Bhosari : रुग्णांना चुकीची औषधे देणा-या दोन बोगस डॉक्टरांना अटक

एमपीसी न्यूज – डॉक्टरकीचे बनावट प्रमाणपत्र दाखवून बोगस दवाखाना सुरु केला. तसेच दवाखान्यात येणा-या रुग्णांना चुकीची औषधे दिली. हा प्रकार भोसरी येथे सफलता आयुर्वेदिक दवाखान्यात सुरु होता. याप्रकरणी दोन बोगस डॉक्टरांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. अहमद इम्तियाज शेख (वय 32, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे), डॉ. मोनी मोहन सुधीर सिन्हा (वय 55, रा. भोसरी. मूळ रा. श्रीकृष्णपूर, जीबनताला, कारखाना चौक, साऊथ चौबीस परघना, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी अभय चंद्रकांत पवार (वय 47, रा. बेलापूर, नवी मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून आरोपींनी पुणे नाशिक रोडवर भोसरी येथे सफलता आयुर्वेदिक दवाखाना सुरु केला होता. दवाखान्यामध्ये येणा-या रुग्णांच्या शारीरिक दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांना बनावट डॉक्टरकीचे सर्टिफिकेट दाखवून चुकीची औषधे दिली. रुग्णांना चुकीची औषधे देऊन त्यांची मानसिक व आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादी पवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा आणि भारतीय दंड विधान कलम 419, 420, 336 अन्वये गुन्हा दाखल करत दोन्ही डॉक्टरांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.