Bhosari: दोन घरफोड्या; 83 हजाराचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – भोसरीत दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी दोन मोबाईलसह मंगळसूत्र असा 83 हजार रूपये किमतीचा ऐवज लंपास केला.

आळंदी रस्ता येथील पहिल्या घटनेप्रकरणी हरिओम शिवमुरत सिंग (वय 28, रा. पाण्याच्या टाकीशेजारी, आळंदी रस्ता, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग हे 23 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता नेहमीप्रमाणे झोपी गेले होते. पहाटे सव्वातीन वाजता त्यांना जाग आली असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून आतमध्ये चार्जिंग लावलेले 13  हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले.

  • तर, इंद्रायणीनगर येथील दुस-या घटनेप्रकरणी दीपक ज्ञानदेव शिंदे (वय 41, रा. गणेशविहार, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. 21  जून रोजी सकाळी शिंदे व त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले होते. दुपारी तीन वाजता ते घरी आले असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून 70 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.