Bhosari : भोसरी आणि चिखलीमधून दोन कार चोरीला

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. दररोज वाहन चोरीचे गुन्हेही दाखल केले जात आहेत. गुरुवारी (दि. 20) भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात कार चोरीला गेल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमेश अशोक सावंत (वय 30, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश यांनी त्यांची पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (एमएच 14 / एचके 1791) 18 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. हा प्रकार 19 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

मुबारक ताहेरसाब आत्तार (वय 53, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आत्तार यांनी त्यांची एक लाख 20 हजार रुपये किमतीची सॅंट्रो कार (एमएच 14 / बीके 0851) 19 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता त्यांच्या सोसायटीच्या समोरील पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. 20 ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.