Bhosari : वाहतूककोंडी प्रकरणी दोन कंटेनरचालकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सुस्थितीत नसलेली वाहने रस्त्यावर आणून ती वाहने बंद पडून वाहतूककोंडीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटना बुधवारी (दि. 16) रात्री बाराच्या सुमारास भोसरी आणि फुगेवाडी परिसरात घडली.

गुरुवीरसिंग सुरतसिंग (रा. नाशिकफाटा, भोसरी) आणि मुस्तफा अब्दुल मोमीन (रा. कुर्ला, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीच चालकांची नावे आहेत. पोलीस शिपाई आर. जी. वाव्हळ आणि पोलीस नाईक यांनी सी. टी. मुंडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरुवीरसिंग आणि मुस्तफा यांनी सुस्थितीत नसलेले कंटेनर रस्त्यावर आणले. दोन्ही कंटेनर रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि फुगेवाडी परिसरात तब्बल सव्वातास वाहतूक ठप्प झाली.

दरम्यान, काही वेळातच त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही वाहतूककोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक झाली. त्यामुळे पोलिसांनी या दोन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.