Bhosari : दोन मद्यपींची पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – दोन मद्यपींनी दारू पिऊन येऊन तरुणाला पूर्ववैमनस्यातून कोयता आणि फावड्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) पहाटे महात्मा फुले नगर दापोडी येथे घडली.

तेजस संजय गायकवाड (वय 27, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी), गणेश उर्फ सुंद्री (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्निल उत्तम गुजर (वय 28, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मामी असे तिघेजण घरासमोर आठ चल्लस हा खेळ खेळत होते. त्यावेळी दोन्ही आरोपी दारू पिऊन तिथे आले. फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारे वैजंता ओव्हाळ यांच्या घरावर आरोपी दगड फेकू लागले.

त्यावेळी फिर्यादी आरोपींच्या जवळ गेले असता आरोपी तेजस याने त्यांच्यातील जुन्या भांडणाच्या कारणावरून स्वप्नील यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी गणेश याने फावड्याच्या लाकडी दांड्याने स्वप्निल यांच्या पायावर मारून जखमी केले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.