Bhosari : भोसरीतील दोन सराईत पुणे जिल्ह्यातून तडीपार

एमपीसी न्यूज- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहशत पसरवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले. मंगळवारी (दि.2) याबाबतचे आदेश देण्यात आले.

करण उर्फ रिंक्‍या सोमनाथ पिटेकर (वय 20, रा.बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) व प्रकाश बसवराज जमादार (वय 21 रा.महात्मापुले झोपडपट्टी) अशी तडीपार केलेल्या सराईतांची नावे आहेत.

पिटेकर याच्यावर खूनाचा प्रयत्न करणे, धमकी, नुकसान करणे, गर्दी, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. तर जमादारवर जबरी चोरी, मारामारी, दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत. दोघांची एमआयडीसी भोसरी परिसरात दहशत असल्याने स्थानिक पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावाला मान्यता देत परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पिटेकर याला एक वर्षासाठी तर जमादार याला दीड वर्षांसाठी तडीपार केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.