Bhosari: नोकराकडूनच मालकाला दोन लाखांचा गंडा; नोकरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीचा माल संबंधितांना पोहचून त्यांनी दिलेले दोन लाख नोकराने मालकाकडे जमा न करता फसवणूक केली. याप्रकरणी नोकरावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फारूक मोहम्मद शेख (रा. कल्याण) असे गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी मना सतिश माळी (वय-40, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा फिर्यादी यांच्याकडे कामाला आहे. आरोपीला नांदेड येथील पांडुरंग नागरे यांना माल पोहचविण्यास सांगितला होता. त्या मालाचे नागरे यांनी दिलेले 64 हजार, मनमाड येथील महावीर ललवानी, एकनाथ बोडके यांच्याकडून प्रत्येकी 45 हजार 500 रूपये असे एकूण 2 लाख 9 हजार 527 रूपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरून माळी यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.