Bhosari : मोटारीत ठेवलेले दोन लॅपटॉप चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चारचाकी वाहनामध्ये ठेवलेले दोन लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 23) भोसरी एमआयडीसी येथे घडली.

याप्रकरणी अभिषेक राजेंद्र कांबळे (वय 34, रा. गंगा ग्लिक्स, कडनगर उंड्री, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक यांनी त्यांच्या मोटारीत दोन लॅपटॉप ठेवले होते. सोमवारी दुपारी साडेतीन ते साडेसहा या कालावधीत त्यांनी त्यांची मोटार थरमॅक्स लिमीटेड कंपनीसमोर उभी केली होती.

यावेळी अज्ञात चोरट्याने वाहनाची डाव्या बाजूची काच फोडली. वाहनात असलेले 30 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरु नेले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.