BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : भोसरी, वाकड परिसरातून दोन मोटारसायकल चोरीला; संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – भोसरी आणि वाकड परिसरातून सुमारे 30 हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवनाथ साईनाथ बर्के (वय 38, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ यांनी त्यांची 20 हजार रुपयांची एमएच 14 / ए जी 5142 ही मोटारसायकल 31 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास स्मशानभूमी रोड मोशी येथे पार्क केली. आपले काम आटोपून अकराच्या सुमारास ते मोटारसायकल जवळ आले असता मोटारसायकल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.

तर, राजेश वासुदेव नायर (वय 48, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश यांनी त्यांची एमएच 14 / 5177 ही 10 हजार रुपयांची दुचाकी वाकड येथील जीजस इज लॉर्ड चर्चसमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. ही घटना 6 जानेवारी 2019 रोजी घडली. आठ महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3