Bhosari: भोसरी आणि चिखली येथून दोन दुचाकी चोरीला

Bhosari: Two two-wheelers stolen from Bhosari and Chikhali फिर्यादी बेग यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 एवाय 9138) ही दुचाकी 29 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली.

एमपीसी न्यूज – भोसरी आणि चिखली परिसरातून दोन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याबाबत गुरुवारी (दि.6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिर्झा शफिक बेग (वय 25, रा. केशवनगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेग यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 एवाय 9138) ही दुचाकी 29 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 30 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

रंजितकुमार मोहसिराम राम (वय 24, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये दुचाकी (एमएच 14 एडी 9420) दि. 13 मे रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली.

त्यानंतर फिर्यादी गावी गेले होते. 1 ऑगस्ट रोजी ते गावाहून परत आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.