Bhosari : शिवीगाळ करताना हाटकले म्हणून दोघांना भोकसले, एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करताना हाटकले म्हणून तिघांनी(Bhosari) दोन भावांना भोकसले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.8) रात्री भोसरीतील महात्मा फुलेनगर येथे घडली आहे. यामुळे परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण तयार झाले होते.

याप्रकऱणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी चन्नाप्पा परशुराम सुतार (वय 22 रा.भोसरी) व काशीनाथ कल्याण उकली (वय 24 रा. भोसरी) यांना अटक केली असून त्यांच्या साथीदार विशाल प्रकाश गुळागर्गी याच्यावरीह गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात स्वराज देवेंद्र गवारगुर (वय 23 रा.भोसरी)

 

Chinchwad : गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांकडून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Bhosari)फिर्यादी हे त्यांच्या घराजवळ बसले होते. यावेळी आरोपी हे रस्त्यावरून शिवीगाळ करत चालले होते. फिर्यादींनी त्यांना येथे महिला बसल्या आहेत शिवीगाळ का करता असे हाटकले. याचा राग येवून फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केलीं. यावेळी चन्नाप्पा याने त्याच्या जवळील धारदार हत्याराने फिर्यादीला भोकसले. फिर्यादी यांचा भाऊ त्यांना वाचवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला ही हत्याराने भोकसले.

यावेळी आरोपींनी परिसरात हातात शस्त्र फिरवून आम्ही या एरियातले भाई आहोत म्हणत दहशत पसरवली. यावेळी नागरिक आपापल्या घरात पळून जाऊन दरवाजे लावून घेतले. पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.