Bhosari : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 8 मे रोजी रात्री दहा वाजता आळंदी-भोसरी रोडवर बनाच्या ओढ्याजवळ घडली.

राजेंद्र दत्तात्रय चव्हाण (वय 38, रा. यमुनानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी  पोलीस नाईक प्रमोद सदाशिव पेठकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेंद्र चव्हाण हे त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच 14 / ईटी 2756) आळंदी-भोसरी रोडने भोसरीकडे येत होते. ते बनाच्या ओढ्याजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात कारने त्यांना धडक दिली.

यात राजेंद्र चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अज्ञात कार चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता, तसेच पोलिसांना माहिती न देता निघून गेला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.