Bhosari: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; आठवड्यानंतर गुन्हा दाखल

Bhosari: Two-wheeler rider injured in vehicle collision; The case was filed a week later

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना 30 मे रोजी दुपारी स्पाईन रोड, मोशी येथे घडली. याबाबत आठवड्यानंतर रविवारी (दि. 7) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय आसाराम उबाळे (वय 37, रा. जय गणेश साम्राज्य, भोसरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / बी एक्‍स 411 यावरील चालक पियुष गणेश होरे (रा. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी उबाळे हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. ते मोशीतील स्पाईन रोड येथे आले असता भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात उबाळे हे गंभीर जखमी झाले. उपचारानंतर त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.