Bhosari: दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वारचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीचालक मृत्यू झाला. तर, मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना भोसरी येथील उड्डाणपुलाजवळ घडली.

दिग्विजय किरण मेदनकर (वय 23, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. तर, तेजस विकास गोपाळे (वय 29, रा. स्पाईन रोड, मोशी) हा गंभीर जखमी झाला आहे.

  • मेदनकर आणि गोपाळे हे 3 जून रोजी पहाटे भूक लागल्याने बुलेट दुचाकीवरून भोसरी येथे निघाले होते. मेदनकर दुचाकी चालवित होता. भोसरी येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव दुचाकी रस्तादुभाजकाला धडकली. यात गंभीर जखमी झाल्याने मेदनकर याचा मृत्यु झाला. तर, गोपाळे याच्या डोके, मनगटाला गंभीर दुखापत झाली. तसेच पोटाला भाजले. भोसरी पोलीस ठाण्यातील फौजदार नामदेव तलवाडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.