Bhosari Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

हा अपघात रविवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजता पुणे-नाशिक रोडवर सीआयआरटी गेट समोर घडला. : Two-wheeler seriously injured in truck collision

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजता पुणे-नाशिक रोडवर सीआयआरटी गेट समोर घडला.

दिगंबर कमलकिशोर पोपळे (वय 25, रा. पुनावळे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिगंबर यांचा चुलत भाऊ हरीश पांडुरंग पोपळे (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी एमएच 04 / जीसी 3606 या क्रमांकाच्या ट्रकच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेदहा वाजता जखमी दिगंबर त्यांच्या पल्सर दुचाकीवरून (एमएच 14 / एचवाय 2325) कंपनीत कामाला जात होते. ते पुणे-नाशिक महामार्गावरील सीआयआरटी गेट समोर आले असता भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

यामध्ये दिगंबर रस्त्यावर पडले. त्यांच्या पोटाला आणि बरगडीला गंभीर दुखापत झाली. आरोपी ट्रक चालकाने अपघाताच्या ठिकाणी ट्रक न थांबवता पुढे जाऊन ट्रक थांबवला आणि पळून गेला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.